'मविआ'च्या महामोर्चाला परवानगी दिली, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

महाविकास आघाडीच्या मुंबईतील महामोर्चाला पोलिसांकडून परवानगी मिळाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
'मविआ'च्या महामोर्चाला परवानगी दिली, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाविकास आघाडी १७ तारखेला भव्य मोर्चा काढणार आहे. यासाठी आता परवानगी मिळाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचनादेखील दिल्या आहेत. ते म्हणाले, "महाविकास आघाडीच्या मुंबईतील महामोर्चाला परवानगी द्यायला काहीही अडचण नाही. पण, मोर्चा हा शांतपणेच व्हायला हवा. लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलने, मोर्चे काढण्याचा अधिकार आहे. सरकार म्हणून आम्ही फक्त कायदा आणि सुव्यस्था नीट पाळली जाईल हेच पाहू."

शनिवारी, १७ मार्चला निघणाऱ्या महामोर्चासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी तब्बल अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. महामोर्चाच्या सुरक्षेची जबाबदारी म्हणून २ अतिरिक्त पोलिस आयुक्त तर ४-५ पोलिस उपायुक्त उपस्थित असणार आहेत. तर, ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण मोर्चावर लक्ष ठेवले जाणार आहे. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संरक्षणासाठी तब्बल दीडशे सुरक्षा रक्षकांची टीम तयार केली आहे.

पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ज्या पद्धतीने वारकरी संप्रदायाबद्दल बोलतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलत आहेत. यांच्याविरोधातही संताप व्यक्त करण्यात येत आहे. तोही व्यक्त करावाच लागेल. त्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in