देशातील पहिले सी फूड प्लाझा मुंबईत; माहीम चौपाटीवर होणार ‘ईट राइट स्ट्रीट फूड हब’
मुंबई : अन्न व औषध प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने माहिम रेतीबंदर येथे 'ईट राईट स्ट्रीट फूड हब सर्टिफिकेट वितरण सोहळा' पार पडला. या वेळी ‘माहिम सी फूड प्लाझा’ हे भारतातील पहिले महिलांनी संपूर्णपणे चालवलेले स्ट्रीट फूड हब म्हणून घोषित करण्यात आले.
उपक्रमात सहभागी असलेल्या १५३ महिलांना अन्न सुरक्षा आणि स्वच्छते संदर्भातील फूड सेफ्टी अँड स्टॅडडॅ अँथोरिटी ऑफ इंडिया प्रमाणपत्र अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या सर्व महिला स्वयं-सहायता गटांशी संबंधित असून, त्या ‘माहिम सी फूड प्लाझा’चे संपूर्ण व्यवस्थापन सांभाळतात.
एफएसएसएआय प्रमाणपत्र देण्यासाठी महिलांना विशेष प्रशिक्षण दिले गेले. यात स्वच्छतेचे नियम, योग्य हाय जेनी कसं राखावे, अन्न साठवणूक कशी करावी, कच्चा माल कसा निवडावा आणि त्याचा वापर व साठा कसा करावा, यावर मार्गदर्शन करण्यात आले. एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अन्न निर्मितीवेळी स्वच्छता आणि अन्न सुरक्षेचे पालन केले जाते, तशीच पद्धत आता या स्ट्रीट फूड स्टॉल्स मध्येही राबवली जात आहे.
महिलांनी घेतलेल्या प्रशिक्षणामुळे स्ट्रीट फूड सुरक्षित आणि आरोग्यदायी ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.