माहुल गावातील घरे बनली पालिकेसाठी डोकेदुखी; सर्व कर्मचाऱ्यांना घर विकत घेण्याची संधी

मुंबई : चेंबुर येथील माहुल गावातील प्रकल्प बाधितांची धूळखात पडलेली घरे विक्री करणे पालिकेसाठी डोकेदुखी बनले आहे. महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कामगारांनी अल्प प्रतिसाद दाखविला असून, यासाठी पालिकेने जुन्या अटीमध्ये बदल करून पालिकेच्या वर्ग १ व्यतिरिक्त इतर सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सदनिका विकत घेता येईल, असे नवीन परिपत्रक नुकतेच काढले आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्रछायाचित्र सौ. Freepik
Published on

मुंबई : चेंबुर येथील माहुल गावातील प्रकल्प बाधितांची धूळखात पडलेली घरे विक्री करणे पालिकेसाठी डोकेदुखी बनले आहे. महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कामगारांनी अल्प प्रतिसाद दाखविला असून, यासाठी पालिकेने जुन्या अटीमध्ये बदल करून पालिकेच्या वर्ग १ व्यतिरिक्त इतर सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सदनिका विकत घेता येईल, असे नवीन परिपत्रक नुकतेच काढले आहे. याकरिता अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ मे २०२५ पर्यंत करण्यात आली आहे.

माहुल गाव येथील एवर स्माईल पी.ए.पी. संकुल, माहुल गाव आंबा पाडा आणि एस.जी.केमिकल व्हिडिकॉन अतिथी आदीं ठिकाणी प्रकल्प बाधितांची १३ हजार घरे रिक्त आहेत. यामुळे त्यांची देखभाल आणि दुरूस्तीसाठी महापालिकेला आर्थिक खर्च करावा लागत असून पालिकेच्या महसूलांवर अतिरिक्त ताण पडत आहे.

यासाठी महापालिकेने ९ हजार ९८ घरे विक्रीसाठी काढली आहेत. यामधील एका सदनिकाची किंमत १२.५० लाख रुपये ठेवण्यात आल्याचा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतला होता. परंतु १५ एप्रिल २०२५ रोजी केवळ १९९ कर्मचाऱ्यांचे अर्ज दाखल झाले होते. या अल्प प्रतिसादामुळे पालिकेने आता आपल्या अटी व शर्तीमध्ये बदल केला आहे.

नवीन अटी

कर्मचारी निवासस्थानात राहणारे महापालिकेचे कर्मचारीसुद्धा सदर सदनिका खरेदी करू शकतो.

एक किंवा दोन सदनिका खरेदी करू शकतात.

प्रस्तावित अट

कर्मचारी निवासस्थानात राहणारे महापालिका कर्मचाऱ्यांना माहुलची घरे विकत घेण्यासाठी पात्र असतील, परंतु कर्मचाऱ्यांना सध्याच्या योजनेत सदनिका वाटप झाल्यास कर्मचाऱ्यांना निवासस्थान रिक्त करावे लागेल.

या सुविधा मिळणार

माहुल गावातील प्रत्येक सदनिकांचे चटई क्षेत्रफळ २२५ चौरस फूट आहे.

ईस्टर्न फ्रीवे आणि सायन -पनवेल महामार्ग जवळ उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी तसेच सार्वजनिक वाहतूक (मोनोरेल स्टेशन, बेस्ट बस मार्ग) सहज उपलब्ध

पार्किंग, मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पाची सोय

क्रीडांगण, मुंबई पब्लिक स्कूल, मार्केट आणि नियोजित प्रसूती रुग्णालय यांचा समावेश

logo
marathi.freepressjournal.in