पत्राचाळ घोटाळा: प्रमुख साक्षीदाराला धमकीचे पत्र

गोरेगांव येथे पत्राचाळ विकास प्रकल्पात आर्थिक घोटाळा झाला असून त्या प्रकरणाचा तपास इडीतर्फे सुरु आहे.
पत्राचाळ घोटाळा: प्रमुख साक्षीदाराला धमकीचे पत्र

मुंबर्इ: उबाठा गटातील शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय राउत यांचा आरोपींमध्ये समावेश असलेल्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील सक्तवसुली संचालनालयाची (र्इडी) प्रमुख साक्षीदार असलेल्या स्वप्ना सुजीत पाटकर यांना, तू खूप फडफडलीस, कोर्टात तोंड उघडून मोठी नावे घेउ नकोस, तुला कोण वाचवणार? अशी धमकी देण्यात आली आहे.

धमकी देणाऱ्याने मराठीत लिहिलेला कागद पाटकर यांच्या बंगल्याच्या आवारात बाटलीत घालून मंगळवारी रात्री १ वाजता फेकला. आवाजाने जागे झालेल्या पाटकरांनी आपल्या बॉडीगार्डला त्या बाबत सांगितले. बॉडीगार्डने फुटलेल्या बाटलीत कागद आल्याचे सांगितले. त्यानंतर स्वप्ना पाटकर यांनी पोलिसांना पाचारण करुन रितसर तक्रार नोंदवली. पाटकर यांचा कलिना येथे बंगला आहे. त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. पोलिसांनी आयपीसी ५०६ कलमाअंतर्गत नादखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस तेथील सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासत आहेत.

गोरेगांव येथे पत्राचाळ विकास प्रकल्पात आर्थिक घोटाळा झाला असून त्या प्रकरणाचा तपास इडीतर्फे सुरु आहे. गल्या वर्षी या प्रकरणात उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राउत यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात पोलिसांनी स्वप्ना पाटकर यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे संजय राउतांवर महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in