राज्याच्या औद्योगिक विकासात एमआयडीसीचे मोठे योगदानन -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

समृद्धी महामार्ग, ट्रान्सहार्बर लिंक यामुळे दळणवळण सोपे होणार आहे. पर्यायाने राज्यातील व्यवसायात वाढ होणार आहे
 राज्याच्या औद्योगिक विकासात एमआयडीसीचे मोठे योगदानन -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशात राज्याचा क्रमांक एक राखण्यात आणि राज्याच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मोठे योगदान असून यापुढे प्रगतीपथावर जाण्यासाठी दोन इंजिन आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हीरकमहोत्सवानिमित्ताने वांद्रे येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘महामंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक भूसंपादन महामंडळाने केले आहे. पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. तरुणांसाठी रोजगारनिर्मिती या महामंडळाच्या माध्यमातून होत आहे. कोविडकाळात उद्योग बंद होऊ न देता काम सुरू राहिले. राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे होत आहेत. समृद्धी महामार्ग, ट्रान्सहार्बर लिंक यामुळे दळणवळण सोपे होणार आहे. पर्यायाने राज्यातील व्यवसायात वाढ होणार आहे. पंतप्रधानांनी राज्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तेव्हा सगळ्यांच्या सहकार्याने औद्योगिक क्षेत्रात पुढे जाऊ, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

उद्योग विभागाचे माजी अपरमुख्य सचिव बलदेव सिंग, प्रधान सचिव तथा उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अनबलगन, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रंगानाईक, पी. डी मलिकनेर, उपस्थित होते. यावेळी विकास दर्पण या माहिती पुस्तकाने प्रकाशन करण्यात आले तर, चर्नी रोड येथे प्रस्तावित असलेले महामंडळाचे कार्यालय कसे असेल, याबाबत ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण केरण्यात आले. यावेळी एमआयडीसीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एम. प्रेमकुमार, एस. व्ही. जोशी, बी. एस. धुमाळ, एम. रामकृष्णन, जयंत कावळे, डॉ. छत्रपती शिवाजी, संजीव सेठी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in