ट्रेनी एअर होस्टेच्या खून प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ; सफाई कर्मचाऱ्याला घेतलं ताब्यात

प्रकरणात पोलिसांनी सोसायटीच्या हाऊसकिपरला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून ताबडतोब तपास सुरू केला आहे.
ट्रेनी एअर होस्टेच्या खून प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई ; सफाई कर्मचाऱ्याला घेतलं ताब्यात

मुंबईतील अंधेरीत एका फ्लॅटमध्ये एक मुलगी मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंधेरीतील मरोळ येथील टाटा पॉवर सेंटर बस स्थानकाजवळ, एनजी कॉम्प्लेक्स, कृष्णलाल मारवाह मार्गावरील फ्लॅटमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव रुपल ओग्रे ( वय २४) असं होतं. ही मृत महिला मुळची छत्तीसगड येथील रहिवासी होती. रुपल ही एअर इंडियात प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबईत आली होती. त्या फ्लॅटमध्ये ती तिची बहीण आणि बहिणीच्या प्रियकरासह राहत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "या मुलाचा गळा धारदार शस्त्राने चिरला गेला होता. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. प्रथमदर्शनी, डॉक्टरांनी लैंगिक अत्याचाराबाबत कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत", या प्रकरणाचा सर्व बाजूंनी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी सोसायटीच्या हाऊसकिपरला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून ताबडतोब तपास सुरू केला आहे. मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. रूपलच्या घरात कोण आले होते, हे जाणून घेण्यासाठी पोलीस सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्र तपासणी करीत आहेत. स्थानिक पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेचे अधिकारीही समांतर तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in