महापालिकेतील बहुसंख्य विद्यार्थी गणवेशाविनाच

यंदा शैक्षणिक वर्ष सुरू होतच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत २७ शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येईल, असा दावा नालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांन अद्याप गणवेश, बूट आदी वस्तू उपलब्ध झालेल्या नसल्याची माहिती उजेडात आली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई: यंदा शैक्षणिक वर्ष सुरू होतच पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत २७ शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येईल, असा दावा नालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांन अद्याप गणवेश, बूट आदी वस्तू उपलब्ध झालेल्या नसल्याची माहिती उजेडात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या सुमारे ११९५ शाळा आहेत. या शाळांत शिकणाऱ्या मुलांना पालिका गणवेशासह २७ शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. त्यासाठी पालिकेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयाची तरतूद केली जाते. पालिका शाळांत शिकणारी बहुतांशी मुले झोपडपट्ट्यांतील मोलमजुरी करणाऱ्या पालकांची असतात. या मुलांना पालिकेकडून आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप केले जाते. शालेच्या पहिल्या दिवशी २७ शालेय वस्तूंपैकी गणवेश तरी विद्यार्थ्यांना मिळेल ही अपेक्षा त्यांच्या पालकांची असते. मात्र अनेकवेळा शैक्षणिक वर्ष संपत आले तरी मुलांना शालेय व वस्तू मिळत नाहीत. पालिका प्रशासनाने यंदाही २७ शालेय वस्तूंचे कार्यादेश उशिराने दिल्याने मुलांना पहिल्याच दिवशी गणवेशाविनाच शाळेत जावे लागले आहे. अजूनही सुमारे ८० टक्के शाळांत २७ शालेय वस्तूंची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. त्यामुळे २७ शालेय - वस्तू उशिराने मिळण्याची प्रथा यंदाही कायम राहिली आहे.

दरम्यान, पालिकेच्या वतीने सन २०२४ ते २०२५ या शैक्षणिक वर्षांसाठी शालेय वस्तूंची खरेदी करण्यात येत असून या खरेदीसाठी जून महिन्याच्या सुरुवातीला कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कार्यादेश दिल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी गृहीत धरल्यास -. महापालिकेच्या शाळांमधील मुलांना ऑगस्ट अखेरपर्यंत नि - या वस्तू मिळण्याची शक्यता आहे. गणवेश, वह्या, बूट, मोजे, दप्तर, स्टेशनरी तसेच छत्र्या व रेनकोट आदी शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा सन २००७ पासून मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. मात्र एक ते दोन वर्षे वगळता प्रत्येक वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी या वस्तूंचे वाटप होत आलेले आहे.

logo
marathi.freepressjournal.in