मराठीच्या प्रसारासाठी स्थानकांत क्यूआर कोड बनवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : मराठी भाषेचे जतन, संवर्धन व प्रचारासाठी विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच मराठी भाषा येत नसलेल्या नागरिकांना मराठीबद्दल माहिती व्हावी, यासाठी रेल्वे स्थानके, बस स्थानके इत्यादी ठिकाणी क्यूआर कोड तयार करावेत.
मराठीच्या प्रसारासाठी स्थानकांत क्यूआर कोड बनवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मराठीच्या प्रसारासाठी स्थानकांत क्यूआर कोड बनवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देशसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मराठी भाषेचे जतन, संवर्धन व प्रचारासाठी विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच मराठी भाषा येत नसलेल्या नागरिकांना मराठीबद्दल माहिती व्हावी, यासाठी रेल्वे स्थानके, बस स्थानके इत्यादी ठिकाणी क्यूआर कोड तयार करावेत. मराठीची जास्तीत जास्त पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध करा, असेही निर्देश एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता तिचा प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणात व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. मराठी भाषा विभागाने मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले.

मराठी भाषा विभागाची बैठक सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या बैठकीस मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सहसचिव नामदेव भोसले, भाषा संचालक विजया डोणीकर, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. परदेशात बृहन महाराष्ट्र मंडळ आहेत तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in