महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या बंधूंच्या संपत्तीवाढीचा वेग १,८६८ टक्के! एकूण १२४.४ कोटींच्या संपत्तीसह BMC निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवारांमध्ये महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे धाकटे बंधू मकरंद नार्वेकर यांचा समावेश आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकूण १२४.४ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या बंधूंच्या संपत्तीवाढीचा वेग १,८६८ टक्के! एकूण १२४.४ कोटींच्या संपत्तीसह BMC निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार
Published on

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवारांमध्ये महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे धाकटे बंधू मकरंद नार्वेकर यांचा समावेश आहे. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकूण १२४.४ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.

भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक २२६ मधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवणारे मकरंद नार्वेकर हे मुंबई पालिका निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरू शकतात.

इतर उच्च संपत्ती असलेल्या उमेदवारांमध्ये माजी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर (४६.५९ कोटी) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार व माजी महापौर श्रद्धा जाधव (४६.३४ कोटी) यांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार (पत्नीची संपत्ती धरून) मकरंद नार्वेकर यांची संपत्ती गेल्या नऊ वर्षांत १,८६८ टक्क्यांनी वाढली आहे. संपत्तीत झालेल्या या प्रचंड वाढीबाबत विचारणा केली असता, पुन्हा तपासून लवकरच माहिती देतो, असे उत्तर त्यांनी दिले; मात्र त्यानंतर त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

ऑक्टोबर २०२२ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत त्यांनी रायगड जिल्ह्यातील वेगाने विकसित होत असलेल्या अलिबाग परिसरात २७ शेती भूखंडांची खरेदी केली आहे. ४७ वर्षीय मकरंद नार्वेकर यांनी आपल्या व्यवसायाचा उल्लेख वकील असा केला आहे.

२०१७ मधील पालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवताना त्यांनी ६.३ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. २०१२ मध्ये अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडणूक लढवताना त्यांची संपत्ती ३.६७ कोटी रुपये होती.

विरोधी पक्षांनी विधानसभा अध्यक्ष व कोलाबा मतदारसंघाचे भाजप आमदार राहुल नार्वेकर यांच्यावर पालिका निवडणुकांच्या उमेदवारी प्रक्रियेत हस्तक्षेप व सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. मात्र हे सर्व आरोप "निराधार व राजकीय हेतूने प्रेरित" असल्याचे त्यांनी फेटाळले आहे.

प्रभाग क्रमांक २२६ मध्ये मकरंद नार्वेकर यांच्या विरोधात एकमेव उमेदवार असलेल्या तेजल पवार यांनी आपण व आपले पती दीपक पवार यांच्यावर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे. त्या अपक्ष असून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे यांचे त्यांना समर्थन आहे.

  • एकूण संपत्ती : ₹१२४.४ कोटी

  • चल संपत्ती : २३२.१४ कोटी

  • अचल संपत्ती : १९२.३२ कोटी

  • कर्ज व देणी : ₹१६.६८ कोटी

  • २०२५-२६ मधील उत्पन्न (आतापर्यंत) :२२.७७ कोटी

मालमत्ता :

  • बँक ठेवी : ₹६,६६,३७०

  • वाहने : टोयोटा फॉर्च्यूनर सिग्मा (२४०.७५ लाख) - टोयोटा फॉर्च्यूनर सिग्मा (₹३८.७५ लाख) मारुती ग्रैंड विटारा (१९ लाख)

  • कुटुंबीय व इतरांकडून देय रक्कम : ₹३०.११ कोटी

  • कुलाबा (दक्षिण मुंबई) येथील फ्लॅट : २७.९९ कोटी

शेती जमीन :

  • एकूण भूखंड : २९

    स्वतःचे : २७

    पत्नी रचना नार्वेकर यांचे : २

  • ठिकाणे : झिराडपाडा, किहीम, ढोकावडे, सासवणे, म्हात्रोळीवाडी, मापगाव

  • सध्याचे मूल्य :

    मकरंद नार्वेकर : २८९.९१ कोटी

    पत्नी : ₹२.४१ कोटी

logo
marathi.freepressjournal.in