Malad Fire : मालाडमधील झोपडपट्टीला लागली भीषण आग

मालाडमध्ये (Malad Fire) झोपडपट्टीला भीषण आग लागली असून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत
Malad Fire : मालाडमधील झोपडपट्टीला लागली भीषण आग

मुंबईतील मालाड (Malad Fire) परिसरात आज सकाळी झोपडपट्टीला भीषण आग लागली. पारेख नगरमधील झोपडपट्टीत लेव्हल २ची आग लागली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या आगीत जवळ जवळपास ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या असून २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एका झोपडपट्टीत आग लागली. त्यानंतर ती आग पसरत गेली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सध्या सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in