रामनवमीदिवशी मुंबईतील मालवणीमध्ये २ गटांमध्ये राडा; मुंबई पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात

काल रामनवमीदिवशी मालाडच्या मालवणीमध्ये २ गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली, मुंबई पोलिसांनी कारवाई केली असून २५ जणांना ताब्यात घेतले
रामनवमीदिवशी मुंबईतील मालवणीमध्ये २ गटांमध्ये राडा; मुंबई पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात
@ANI

कालचा दिवस हा छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या रात्री झालेल्या हिंसाचारामुळे चांगलाच गाजला होता. मात्र, रामनवमीदिवशी मुंबईच्या मालवणीमध्येही २ गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली. या परिसरामध्ये निघालेल्या शोभायात्रेत गोंधळ झाला आणि २ गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि २५ जणांना याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. तसेच, या बाचाबाचीमध्ये ७ जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

रामनवमीनिमित्त मालवणी परिसरात भाजप युवा मोर्चा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी २ गटांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरु झाली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी २५ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in