मालाड स्थानक अतिक्रमणमुक्त ; एका आठवड्यात ४० बेकायदा दुकाने जमीनदोस्त

आठवड्यात मालाड पश्चिम येथील ४०हून अधिक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्याने मालाड पश्चिम येथील वाहतूक कोंडीची समस्या दूर
मालाड स्थानक अतिक्रमणमुक्त ; एका आठवड्यात ४० बेकायदा दुकाने जमीनदोस्त

अनधिकृत बांधकामामुळे वर्षानुवर्षे वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या मालाडकरांना दिलासा मिळाला आहे. वाहतुकीस अडथळा ठरणारी एम. एम. मिठाईवालासह ४०हून अधिक अनधिकृत दुकाने जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे मालाड पश्चिम येथील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या जनता दरबारात येथील स्थानिक रहिवाशांनी वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या मांडली होती. मालाड मधील वाहतुकीस अडथळा ठरणारी बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करा, असे निर्देश लोढा यांनी दिले आणि पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी एक महिन्यात बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा करुन देण्याची जबाबदारी सहायक अभियंता मंदार चौधरी यांच्यावर सोपवण्यात आली. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एका आठवड्यात मालाड पश्चिम येथील ४०हून अधिक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्याने मालाड पश्चिम येथील वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली असून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचे पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in