Mumbai : मालाडमधील स्टुडिओला आग; चित्रीकरणाचे साहित्य खाक

मालाड पश्चिमेकडील एका प्रसिद्ध चित्रीकरणस्थळाला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. मढ मार्वे रोडवरील योग आश्रमजवळील ‘दाना पाणी भुल्लर गार्डन स्टुडिओ’मध्ये लागलेल्या या आगीत स्टुडिओचे साहित्य आणि कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Mumbai : मालाडमधील स्टुडिओला आग; चित्रीकरणाचे साहित्य खाक
Published on

मुंबई : मालाड पश्चिमेकडील एका प्रसिद्ध चित्रीकरणस्थळाला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. मढ मार्वे रोडवरील योग आश्रमजवळील ‘दाना पाणी भुल्लर गार्डन स्टुडिओ’मध्ये लागलेल्या या आगीत स्टुडिओचे साहित्य आणि कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पहाटे सव्वासहाच्या सुमाराला ही आग लागली. आगीची मुंबई अग्निशमन दलासह स्थानिक पोलीस आणि महापालिकेच्या ‘पी-उत्तर’ विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग स्टुडिओमधील विद्युत वायरिंग, वॉलपेपर, फोम मॅट्रिसेस, कार्पेट, बांबू आणि लाकडी फर्निचरमुळे वेगाने पसरली. आगीत कार्यालयातील फर्निचर, रेकॉर्ड्स, परफ्युम, वातानुकूलित यंत्रे आणि चित्रीकरणासाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले. स्टुडिओच्या आवारातील तळ अधिक एक मजली इमारतीमधील ३ हजार चौ.फुटाच्या ५ ते ६ गाळ्यांना या आगीचा फटका बसला. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत सकाळी आग आटोक्यात आणली.

ताडदेवमध्ये आग

दुपारी १२:४४ वाजता ताडदेव येथील १६ मजली ‘साई लीला को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’च्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने प्रतिसाद देत या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

logo
marathi.freepressjournal.in