मलेरिया, डेंग्यूला आता आळा बसणार; डासांचे अड्डे नष्ट करण्यासाठी कीटकनाशक विभागाची मोहीम

संततधार पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरेसीसच्या आजाराने डोके वर काढले आहे
मलेरिया, डेंग्यूला आता आळा बसणार; डासांचे अड्डे नष्ट करण्यासाठी कीटकनाशक विभागाची मोहीम

मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून डासांच्या अळ्यांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी कीटकनाशक विभागाने विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत रुग्णालय परिसर, बांधकामे, गॅरेज व अडगळीची ठिकाणे आढळणाऱ्या डासांच्या अळ्यांचा शोध घेत डासांच्या अड्ड्यांचा खात्मा करण्यात येणार आहे.

मुंबई मागील काही दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरेसीसच्या आजाराने डोके वर काढले आहे. आतापर्यंत सप्टेंबर महिन्याच्या १८ तारखेपर्यंत मलेरियाचे ३९८ आणि डेंग्यूचे १३६ नवीन रुग्ण आढळून आले. तर अतिसार अर्थात गॅस्ट्रोचे २०८ नवीन रुग्ण आढळून आहे. जानेवारीपासून ते १८ सप्टेंबरपर्यंत मलेरियाचे २९९० आणि डेंग्यूचे ४९२ एवढी रुग्ण संख्या झाली असून मलेरियाचा एक, तर डेंग्यूच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील १८ दिवसांमध्ये डेंग्यूचे तब्बल १३९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ज्या भागांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. त्या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्यांचा शोध कीटकनाशक विभागाकडून सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे वाढत्या डेंग्यू रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णालय परिसर तसेच पाणी साचून राहणाऱ्या अडगळीच्या ठिकाणी कीटकनाशक कीटकनाशक विभागाकडून औषध फवारणी आणि धूर फवारणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in