मलेरिया, गॅस्ट्रोचा धोका वाढला, गेल्या १२ दिवसांत मलेरियाचे १२७, तर गॅस्ट्रोचे २०१ रुग्ण

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका वाढला असताना आता पावसाळी आजारांचा धोका वाढला
File Photo
File Photo
Published on

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा मुंबईत धोका वाढला आहे. जून महिन्याच्या १२ दिवसांत मलेरिया, गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले असून स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाच्या चौथ्या लाटेसह पावसाळी आजारांचे टेन्शन वाढले आहे. मलेरिया, गॅस्ट्रो पावसाळी आजारांचा वांद्रे पूर्व, कुर्ला, माहीम, धारावी, वरळी या भागात झपाट्याने प्रसार आहे.

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका वाढला असताना आता पावसाळी आजारांचा धोका वाढला आहे. पावसाचे आगमन होण्याआधी साथीच्या आजारांनी डोकेवर काढले आहे. १ ते १२ जूनपर्यंत मलेरिया, डेंग्यू, कावीळ, लेप्टो, गॅस्ट्रो हे साथीचे आजार बळावत असून थंडीत पसरणाऱ्या स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळल्याने मुंबईत कोरोना पाठोपाठ पावसाळी आजारांनी चिंतेत भर टाकली आहे.

रुग्णसंख्या (१ ते १२ जून)

मलेरिया : १२७

गॅस्ट्रो : २०१

कावीळ : २६

डेंग्यू : १४

लेप्टो : ४

स्वाईन फ्ल्यू : १

logo
marathi.freepressjournal.in