हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी बंधनकारक; प्रदूषण मंडळाचे कारवाईचे संकेत

वर्तमानातील बांधकामाच्या प्रगतीचा वेग आणि रेडिमिक्स प्लांटमुळे निर्माण होणारी हवाए प्रदूषणाची समस्या यावर मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक अधिसूचना लागू केल्या आहेत. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचनांची अमंलबजावणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे म.प्र.नि. मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी स्पष्ट केले.
हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी बंधनकारक; प्रदूषण मंडळाचे कारवाईचे संकेत
एक्स
Published on

मुंबई : वर्तमानातील बांधकामाच्या प्रगतीचा वेग आणि रेडिमिक्स प्लांटमुळे निर्माण होणारी हवाए प्रदूषणाची समस्या यावर मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक अधिसूचना लागू केल्या आहेत. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचनांची अमंलबजावणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे म.प्र.नि. मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी स्पष्ट केले.

म.प्र.नि. मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम यांच्या अध्यक्षतेखाली व मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत मुंबई महानगर प्रादेशिक परिसरातील क्षेत्रासाठी स्टोन क्रशर, हॉट मिक्स प्रकल्प व आरएमसी प्रकल्पधारक यांची बैठक नुकतीच बोलाविण्यात आली होती. बैठकीत हवेची गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी नवीन मार्गदर्शक अधिसूचना लागू करण्यात आली.

गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध क्षेत्रातील बांधकाम क्षेत्र, मुंबईतील पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने सुरू असलेली विविध विकासकामे, स्टोन क्रशर, बेकरी, रेडिमिक्स कारखाने यांना मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. यामध्ये पालिका क्षेत्रात कार्यरत असलेले उद्योग अथवा कारखाने यांनी या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मार्गदर्शक अधिसूचनेतील प्रमुख निकष :

नियोजित असलेल्या कमीत-कमी वीस हजार वर्ग मीटर बांधकाम प्रकल्प क्षेत्रामधील जागेत कॅप्टिव्ह-रेडी मिक्स काँक्रीट प्रकल्पासाठी

दोन हजार वर्ग मीटर राखीव जागेची तरतूद करणे आवश्यक आहे.

कॅप्टिव्ह-रेडी मिक्स काँक्रीट अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांना पुढील ३ महिन्यांच्या काळात पूर्णत: बॉक्स टाईप आच्छादन करून घेणे

आवश्यक असून, त्याकरिता रु.१० लाखांची बँकहमी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करणे आवश्यक आहे.

जर एखाद्या बांधकाम प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाले असेल तर, तेथील कॅप्टिव्ह-रेडी मिक्स काँक्रीट कारखाना एक महिन्याच्या कालावधीत प्रकल्प स्थलांतरीत करणे आवश्यक राहील.

नवीन रेडिमिक्स प्लांट महानगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात उभारावयाचा असल्यास म.प्र.नि.मंडळ स्तरावर स्थापित केलेल्या समितीच्या परवानगीनंतरच सदरहू प्रकल्प स्थापित करता येतील.

नवीन व्यावसायिक प्रकल्पांना १००० वस्ती असलेल्या क्षेत्रापासून राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व जिल्हा प्रमुख रस्ते यापासूनचे अंतर ५०० मीटर असणे आवश्यक आहे.

तसेच शाळा, कॉलेज, रुग्णालय व न्यायालय यापासून यापासूनचे अंतर ५०० मीटर असणे आवश्यक आहे.

नवीन व्यावसायिक प्रकल्पासाठी महापालिका, नगरपरिषद क्षेत्राबाहेरील प्रकल्पांना कमीत-कमी ४ हजार वर्ग मीटर जागेची आवश्यकता राहील.

सुरुवातीपासूनच स्थापित असलेल्या व्यावसायिक आरएमसी प्रकल्पांना पुढील ३ महिन्यात पूर्णत: बॉक्स टाईप आच्छादन करून

घेणे आवश्यक असून, त्याकरिता रु.२५ लाखाची बँकहमी देणे आवश्यक आहे.

तसेच सुरुवातीपासूनच व्यावसायिक प्रकल्पासाठी स्थापित असलेल्या आरएमसी यांना क्षमता वाढविण्यास बंदी असेल.

...तर कारवाई करणार

मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने काही उपाययोजना केल्या आहेत. रेडी मिक्स प्लांट, स्टोन क्रशर, बेकरी किंवा अन्य तत्सम उद्योगातून जर प्रदूषण झाले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

- सिद्धेश कदम, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

logo
marathi.freepressjournal.in