मुंबई : वादग्रस्त विधानामुळे महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे ४२ सेकंद नव्हे, तर १८ ते २२ मिनिटे सभागृहात पत्ते खेळत असल्याचा अहवाल विधी मंडळाचा असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर करण्यात आला आहे, अशी माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत दिली.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात पत्ते खेळत असतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी पोस्ट केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड वायरल झाला आणि कोकाटे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.