

मुंबई : कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. त्यानंतर जैन समाजाने आक्रमक भूमिका घेत दादर येथील कबुतरखान्याजवळ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कबुतरखाना परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गुजरातमध्ये पतंग महोत्सवात मांजाने पक्षी मरतात तेव्हा तुमचा धर्म कुठे जातो, असा सवाल शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विचारला.
जेव्हा गुजरातमध्ये पतंग महोत्सव होतो तेव्हा अनेक पक्षी मांजामुळे मरून पडतात. तेव्हा कोणाच्या भावना दुखावत नाहीत. त्यामुळे हा वैज्ञानिक विषय आहे. ज्यामध्ये कोणीही धार्मिक रंग आणू नये. हे लोक म्हणतात की आम्ही आता नोटाला मत देऊ आणि निवडणुकीत धडा शिकवू. तर असे जैन धर्मात कुठे काही सांगितले आहे का? तसेच, कबुतर फक्त दाणेच खातात का? तर असे नाही. ते अनेक किटक वगैरे पण खातात, याची माहिती त्यांनी प्राणी शास्त्रज्ञांकडून घ्यावी, असा टोला कायंदे यांनी लगावला.