मनोज जरांगे-पाटील यांची नार्को टेस्ट करा! अजय महाराज बारसकर यांची मागणी

मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी मनोज जरांगे पाटील यांच्या काळ्या कारनाम्याचे मोठे बॉम्बस्फोट होणार आहेत.
मनोज जरांगे-पाटील यांची नार्को टेस्ट करा! अजय महाराज बारसकर यांची मागणी

मुंबई : मराठा आरक्षण व मराठा समाज याबाबत देशभर संभ्रम निर्माण झाला असताना अजय महाराज बारसकर यांनी शनिवारी दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे-पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचे, धमकी देणे, आंदोलनादरम्यान चोरून दूध भात खाणे, पाय चेपून घेणे, संभाजी महाराज यांच्या नावाने पैसे खाणे आदी आरोप केले.

मनोज जरांगे-पाटील यांनी माझ्यावर जे विनयभंगाचे, बलात्काराचे आरोप केले आहेत, ते सर्व खोटे आहेत. त्यांनी सर्व पुरावे दाखवावे व माझ्यावर गुन्हा दाखल करावा. जरांगे यांच्यावर ४२० चे गुन्हे नोंद आहेत. रेती व्यवसाय करून डंपर, जेसीबी कसे काय आले? याबाबत मी इन्कम टॅक्स विभागात तक्रार करणार आहे. आंदोलनादरम्यान कुणाकुणाच्या कुटुंबाला पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती. असे अनेक रेकॉर्डिंग, पुरावे मी सरकारी तपास यंत्रणा व पत्रकारांना देणार आहे, असे बारसकर म्हणाले.

मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी मनोज जरांगे पाटील यांच्या काळ्या कारनाम्याचे मोठे बॉम्बस्फोट होणार आहेत. बॉम्बस्फोट करणारे वेगळे लोक आहेत. ते उद्या जगाला कळणार आहे. जाणता राजा व त्यांची माणसे मला मारायला टपली आहेत. मात्र मुंबई पोलीस माझे चांगले संरक्षण करत आहेत. जरांगे यांनी जर माझ्यावरील आरोप सिद्ध केले तर मी या ठिकाणी फाशी घेईन. त्यांचे आरोप मी सिद्ध करून दाखवणार आहे, मग त्यांनी काय करावे हे जनताच ठरवेल, असे बारसकर म्हणाले.

“अशिक्षित, भामटा, धूर्त, नौटंकी माणूस आहे. स्वत: मोठे होण्याची स्वप्न पाहणे व सहकाऱ्यांवर खोटे आरोप करणे, हा त्याचा स्वभाव आहे,” असा आरोप बारसकर यांनी केला. त्याला कोणी प्रवक्ता नाही, वकील नाही , सल्लागार नाही, सर्व कार्यक्रम एकटाच करत आहे. आता वयोवृद्ध आंदोलनात सहभागी करायला निघालेल्या जरागेंच्या मागे तरुण वर्ग कमी होत चालला आहे, असे आरोप बारसकर यांनी यावेळी केले.

logo
marathi.freepressjournal.in