मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रमुख सल्लागार आणि राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी शुक्रवारी महारेराचे तिसरे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.
मावळते अध्यक्ष अजोय मेहता यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यापूर्वी मंत्रालयात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यानंतर त्यांनी महारेराच्या मुख्यालयात पदभार स्वीकारला.
याप्रसंगी महारेराचे सदस्य महेश पाठक, रवींद्र देशपांडे, सचिव डॉ. वसंत प्रभू यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी महारेराचे संचालक (अनुपालन) रमेश पवार, संचालक (नोंदणी) विनोद चिठोरे, उपसंचालक (तक्रारी) सुधाकर देशमुख इ. उपस्थित होते.