कंत्राटदाराला प्रतिदिन २० लाखांचा दंड; मंत्रालयाच्या ॲनेक्स इमारतीचे काम संथ गतीने

मंत्रालय मुख्य इमारतीला लागून उभ्या राहत असलेल्या 'नवीन ॲनेक्स २' इमारतीचे बांधकाम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिदिन २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कंत्राटदाराला प्रतिदिन २० लाखांचा दंड; मंत्रालयाच्या ॲनेक्स इमारतीचे काम संथ गतीने
कंत्राटदाराला प्रतिदिन २० लाखांचा दंड; मंत्रालयाच्या ॲनेक्स इमारतीचे काम संथ गतीनेप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : मंत्रालय मुख्य इमारतीला लागून उभ्या राहत असलेल्या 'नवीन ॲनेक्स २' इमारतीचे बांधकाम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिदिन २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दंडात्मक कारवाईपोटी विभागाने आतापर्यंत १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम संबंधित कंत्राटदाराच्या देयकातून कापून घेण्यात आली आहे. शासकीय इमारत बांधकामाच्या विलंबापोटी मोठा दंड आकारण्याची अलीकडच्या काळातील पहिलीच घटना आहे. मंत्रालयातील जागेच्या अडचणीमुळे मंत्री कार्यालयांना सोयीची जागा उपलब्ध होत नसल्याने सरकारने उद्यान प्रवेशद्वाराजवळ नवीन पाच मजली इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. ११० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारी इमारत ऑगस्ट २०२५ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन होते.

अशी आहे इमारत

प्री फॅब या आधुनिक तंत्राने बांधण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक ‘नवीन अनेक्स २’ इमारतीचे बांधकाम १०० दिवसात पूर्ण करण्याचे सुरुवातीला नियोजन होते. मात्र, बांधकाम अद्याप पूर्ण झाले नाही. या सततच्या विलंबामुळे कंत्राटदाराला दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून १ जुलै २०२६ ते १५ जुलै २०२६ या १५ दिवसात प्रतिदिन १० लाख रुपयांचा दंड आकाराला. तर १६ जुलै २०२६ पासून दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके यांनी दिली. आता ऑक्टोबर अखेरपर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in