मुंबई : पाणी, शौचालय आदी सोयीसुविधा प्रशासनाने उपलब्ध करून न दिल्याने आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी सकाळी सीएसएमटी स्थानकाबाहेर रस्त्यावर तब्बल तीन तास चक्काजाम आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी थेट बस, गाड्यांच्या टपावर चढून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलकांना हटविण्यात पोलिसांना अपयश आल्यानंतर अखेर मनोज जरांगे-पाटील यांनी रस्ता खुला करण्याचे आवाहन आंदोलकांना केले. त्यानंतर कार्यकर्ते आणि पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरु केली.
मराठा आंदोलनासाठी पहिल्या दिवशी आलेले आंदोलक रात्री गाड्या, रेल्वे स्थानकात झोपले. यानंतर आज आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. याचा निषेध करत आंदोलकांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालय व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील रस्त्यावर ठिय्या मांडला.
काहींनी महानगरपालिकेसमोर शेगडी पेटवत नाष्टा बनविला तर काहींनी महापालिकेच्या सेल्फी पॉइंटवरील कृत्रिम तलावात आंघोळ केली. आंदोलकांनी रस्ता ८ जाम केल्याने सकाळी वाजल्यापासून आझाद मैदान परिसरात वाहतूककोंडी झाली होती. यावेळी वाहतूककोंडीत आंदोलक अडकलेल्या बेस्टच्या बसच्या टपावरून चढले. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या समोरील सिग्नलच्या खांबांवर, तर काही आंदोलक झाडावर तर काही आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेट्सवर चढले. सीएसएमटी स्थानकाबाहेरील ऊ रस्त्यावर झालेली कोंडी फोडण्यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही. मनोज जरांगे यांनी आंदोलकांना रस्ता मोकळा डे करण्याचे आवाहन केल्यानंतर ज दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास आंदोलक बाजूला झाल्याने अखेर साडेचार तासांनंतर वाहतूककोंडी फुटली.
आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी पोलीस, केंद्रीय राखीव दल तैनात करण्यात आले होते. आंदोलक रस्त्यावरून य बाजूला झाल्यानंतर संरक्षणामध्ये सीएसएमटीकडून हुतात्मा चौककडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र महापालिका मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती.