महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

महाराष्ट्रातील महायुती सरकारने मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील (४३) यांना शुक्रवारी आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊन मोठी घोडचूक केली. या आंदोलनामुळे संपूर्ण मुंबईत गोंधळ उडाला आणि पावसाळ्याच्या दिवशी लाखो मुंबईकरांचे हाल झाले.
महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती
छायाचित्र : विजय गोहिल
Published on

एस. बालकृष्णन/मुंबई

महाराष्ट्रातील महायुती सरकारने मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील (४३) यांना शुक्रवारी आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊन मोठी घोडचूक केली. या आंदोलनामुळे संपूर्ण मुंबईत गोंधळ उडाला आणि पावसाळ्याच्या दिवशी लाखो मुंबईकरांचे हाल झाले.

सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर प्रचंड गर्दी होणार याची सरकारला जाणीव होती. त्यातच जर राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून हजारो लोक मुसळधार पावसात मुंबईत दाखल झाले तर काय बोजवारा उडेल याबाबत सरकार अनभिज्ञ नव्हते आणि शुक्रवारी नेमके तेच घडले. गणेशोत्सवामुळे आधीच पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण असल्याने पोलिसांनी सरकारला आंदोलनास परवानगी नाकारण्याचा सल्ला दिला होता. तरीही गृह खाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गृह विभागाने दोन

अटींचा भंग

यावेळी सरकारने परवानगी दिली असली तरी काही अटी घातल्या होत्या. परंतु त्या सगळ्याच अटींचा भंग झाला. जरांगे यांनी केवळ ५,००० समर्थकांनाच शहरात आणायचे अशीही एक अट होती. प्रत्यक्षात पोलिसांच्या अंदाजानुसार ४०,००० पेक्षा जास्त लोक ट्रक, कार, एसयूव्ही, टेम्पो अशा वाहनांतून आले आणि त्यांनी बरोबर आणलेल्या सामानातून आणि अन्नपाण्यातून ते दीर्घकाळासाठी आल्याचे स्पष्ट झाले.

भीतीपोटी परवानगी

मंगळवारीच मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे-पाटील यांना पोलिसांची परवानगी नसताना आंदोलन करू नये, असे आदेश दिले होते. त्यामुळे सरकारवर परवानगी देण्याची काहीही जबाबदारी नव्हती. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या भीतीने मागे हटून सरकारने परवानगी दिली. हीच एक मोठी चूक ठरली आणि त्याची किंमत लाखो मुंबईकरांना मोजावी लागली. संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. लोक तासन्तास गाड्यांमध्ये अडकून पडले.

वाहतूक रोखली

पूर्व दूतगती मार्गासह अनेक रस्त्यांवर आंदोलकांनी वाहतूक रोखली. त्यांनी जवळजवळ सीएसएमटी स्टेशन ताब्यात घेतले. परवानगी फक्त एका दिवसासाठी होती, तरी जरांगे-पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, ओबीसींच्या आरक्षणातून १० टक्के मराठ्यांना देण्याची माझी मागणी आहे आणि ती पूर्ण होईपर्यंत मी आझाद मैदान सोडणार नाही. सरकारने एक दिवसाची परवानगी वाढवली आहे. आझाद मैदानात हजारोंच्या उपस्थितीत त्यांनी गर्जना केली की, यावेळी मी रिकामा परतणार नाही, गोळी झेलावी लागली तरी चालेल.

logo
marathi.freepressjournal.in