Maratha Reservation : हसन मुश्रीफांची फोडली गाडी ; पोलिसांनी घेतलं तिघांना ताब्यात...

गाडीवर हल्ला झाला त्या परिसरात आधीपासून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आले होते.
Maratha Reservation : हसन मुश्रीफांची फोडली गाडी ; पोलिसांनी घेतलं तिघांना ताब्यात...
Published on

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलचं पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी हिंसक रूपं धारणं केलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी आमदार, खासदारांच्या घराची जाळफोड करण्यात आली आहे. त्याच्या गाड्या देखील अडवल्या आहेत. यादरम्यान, आज मुंबईत मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. आकाशवाणी आमदार निवासाबाहेर मुश्रीफांच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान मरीन ड्राइव्ह पोलीसांनी या प्रकरणांत तिघांना ताब्यात घेतल आहे.

मराठा आंदोलकांकडून मुद्दाम हसन मुश्रीफ यांची गाडी हेरली आणि त्याच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. यावेळी त्या परिसरात उपस्थित पोलिसांनी लगेच या हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेतल आहे. पोलीसांनी हल्ला करणाऱ्यांसोबत व्हिडीओ काढणाऱ्या त्यांच्या साथीदाराला देखील ताब्यात घेतल आहे.

गाडीवर हल्ला झाला त्या परिसरात आधीपासून मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आले होते. या प्रकरानंतर येथे अजून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ज्यांनी हल्ला केला ते मराठा आंदोलक वैजापूरहून इथून आले असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. अजय साळुंखे, संतोष निकम, दिपक सहानखुरे असे या तिघांची नावे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in