
मेघा कुचिक/ मुंबई :
गेल्या तीन दिवसांपासून मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईच्या विविध व्यवस्थांचे बारा वाजले आहेत.
फोर्ट, चर्चगेट, मंत्रालय परिसरात सध्या विविध ठिकाणी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव रस्ते बंद केले आहेत. सोमवारी कामाला जाणाऱ्या नोकरदारांचे या रस्ते बंदीमुळे मोठे हाल होण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण आंदोलनासाठी आझाद मैदानावरील परवानगी पोलिसांनी आणखी एका दिवसासाठी वाढवली आहे.
पोलीसांची कठोर व्यवस्था
आंदोलकांची संख्या : २५,०००
पोलिस कर्मचारी : २,०००
वाहतूक पोलीस : ७५०
आझाद मैदान परिसरातील आंदोलकांची वाहने : ४००