
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे रविवारी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानावर पोहोचल्या. मात्र यावेळी आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुळे यांची गाडी रोखत त्यांना घेराव घातला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. त्यामुळे आझाद मैदान परिसरात काही काळ तणाव वाढला होता. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी केली.
जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी खासदार सुळे आझाद मैदानाकडे येत असताना त्यांची कार अडवून आंदोलकांनी घेराव घातला.