स्थगिती कालावधीत मराठी शिका; 'मराठी संवाद भाषा' अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्रात व्यवसाय करताना येथील नागरिकांशी दैनंदिन व्यवहार करण्यासाठी मराठी भाषेत संवाद साधता येणे महत्त्वाचे आहे. रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित प्रवासी वाहने चालवणाऱ्या अमराठी चालकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी पुढाकार घ्यावा...
स्थगिती कालावधीत मराठी शिका; 'मराठी संवाद भाषा' अभियानात सहभागी होण्याचे आवाहन
स्थगिती कालावधीत मराठी शिका; 'मराठी संवाद भाषा' अभियानात सहभागी होण्याचे आवाहन
Published on: 

मुंबई : महाराष्ट्रात व्यवसाय करताना येथील नागरिकांशी दैनंदिन व्यवहार करण्यासाठी मराठी भाषेत संवाद साधता येणे महत्त्वाचे आहे. रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपआधारित प्रवासी वाहने चालवणाऱ्या अमराठी चालकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी संवाद भाषा अभियानात’ सहभागी व्हावे, असे आवाहन करत १८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार असल्याचा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.

‘महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या पुढील टप्प्याच्या नियोजनासंदर्भात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला परिवहन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर, अपर परिवहन आयुक्त रवी गायकवाड, कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रदीप ढवण, मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले, मराठी विश्वकोश मंडळाचे डॉ. शामाकांत देवरे तसेच राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

वाहनचालकाला प्रवाशांशी सहज आणि आत्मविश्वासाने संवाद साधता यावा, या उद्देशाने परिवहन विभागाकडून अमराठी चालकांसाठी मोहीम राबवण्यात येत आहे.

सर्वांनी प्रशिक्षण पूर्ण करावे

राज्यात ९ लाखांहून अधिक रिक्षा व टॅक्सी चालकांकडे नोंदणी व बॅज (प्रमाणपत्र) आहेत. राज्यात सुमारे ९ लाख ७८ हजार रिक्षा व टॅक्सी चालक कार्यरत असून, त्यामध्ये सुमारे ९ लाख १६ हजार ऑटोरिक्षा चालक आणि ६१ हजारांच्या आसपास टॅक्सी चालकांचा समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) रिक्षाचालकांची संख्या ४ लाख ४० हजार २३८, तर टॅक्सीचालकांची संख्या ४३ हजार १०६ इतकी आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in