
मुंबई : वाराणसीमधील आयएमएस बीएचयू रुग्णालयातील ज्युनिअर महिला डॉक्टरवर ओपीडी सुरू असताना गुंडांनी धारधार शस्त्रांनी वार केले. त्यात ही महिला डॉक्टर जबर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हल्ल्याचा कूपर, केईएम, नायर आणि सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने तीव्र निषेध केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करून अटक करा आणि अशा घटना भविष्यात घडू नये, यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी बीएमसी मार्ड संघटनेने केली आहे.