यंदा मरीन लाईनला सर्वाधिक ध्वनिप्रदूषण; प्रदूषण पातळीत झाली वाढ

मिरवणुकींमध्ये होणाऱ्या आवाज प्रदूषणाची तपासणी आवाज फाउंडेशनने केली.
यंदा मरीन लाईनला सर्वाधिक ध्वनिप्रदूषण;  प्रदूषण पातळीत झाली वाढ

यंदा गणेशोत्सव निर्बंध मुक्त असल्याने गणेशभक्तांनी आणि मंडळांनी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. मात्र, असे असताना गणपती विसर्जनाच्या पाचव्या दिवशी ढोल, कर्णकर्कश लाऊडस्पीकर आणि बॅंजोच्या वापरामुळे आवाजाची पातळी वाढल्याचे आवाज फौंडेडेशनच्या तपासणीत समोर आले आहे. दोन वर्षे निर्बंध असल्याने आवाजाची पातळी कमी होती. परंतु २०१९ च्या तुलनेतही प्रदूषणाची पातळी वाढली आहे. मिरवणुकीमध्ये ड्रम आणि बॅंजो सारख्या वाद्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने सर्वाधिक ध्वनी प्रदूषण झाले असल्याचे ही आवाज फाउंडेशनने म्हटले आहे.

गणपती विसर्जनासाठी निघणाऱ्या मिरवणुकींमध्ये होणाऱ्या आवाज प्रदूषणाची तपासणी आवाज फाउंडेशनने केली. त्यात त्यांनी मरीन ड्राइव्ह, वांद्रे, एसव्ही रोड या ठिकाणी आवाजाची पातळी मोजली. त्यात मरीन ड्राइव्हच्या बाबुलनाथ कोपऱ्यात ११५.६ डीबी तर वांद्रे येथे एस व्ही रोडवर ११२.१ डीबी नोंद झाली. मरीन ड्राइव्ह नंतर दुसऱ्या क्रमांकाचे ध्वनी प्रदूषण लिंकिंग रोड येथे १०९.४ डीबी नोंदवले गेले. याचबरोबर एसव्ही रोड, खिरा नगर येथे मेट्रोचे काम सुरू आहे. याठिकाणी मोठमोठ्या धातूच्या प्लेट्स लावण्यात आल्या आहेत. मिरवणुकीतील वाद्यांचा आवाज मेट्रो बांधकामाच्या धातूच्या अडथळ्यांमधून ध्वनी परावर्तित होत असल्याने मोठ्या ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली. २०१९ मधील सर्वोच्च आवाजाची पातळी १११.५ डीबी नोंदवली होती. याबाबत आपण मुख्यमंत्री, पोलीस, पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार नोंदवली असल्याचे आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलली यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in