मरिन लाईन्स पादचारी पुलावरील लाद्या उखडल्या

मरिन लाईन्स स्टेशनवरुन प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पादचारी पूल बांधण्यात आला होता
मरिन लाईन्स पादचारी पुलावरील लाद्या उखडल्या

मरिन लाईन्स येथील ९० फुट रोडवर असलेल्या पादचारी पुलावरील लाद्या उखडल्या तसेच लाद्या बसवताना पाणी जाण्यासाठी उतरती जागा न ठेवल्याचे पालिकेच्या दक्षता विभागाने केलेल्या तपासणीत आढळून आले. त्यामुळे कंत्राटदाराकडून नव्याने काम करुन घेत संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना पूल विभागाला केल्याचे पालिकेच्या दक्षता विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मरिन लाईन्स स्टेशनवरुन प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पादचारी पूल बांधण्यात आला होता; मात्र पुलावरील लाद्या उखडल्याने कंत्राटदाराची नियुक्ती करत पुलांचे सौंदर्यीकरणाचे काम २०१९ मध्ये देण्यात आले होते. यासाठी ३ कोटी २७ लाख रुपये खर्च करण्यात आले; मात्र दोन वर्षे होण्याआधी पुलावरील लाद्या उखडल्या तसेच पुलावर जमा होणारे पाणी जाण्यासाठी उतरती जागा ठेवली नव्हती. त्यामुळे पादचाऱ्यांचा अपघात होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त तक्रारी नंतर दक्षता विभागाने पुलावरील कामाची तपासणी केली असता निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे दिसून आले. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करण्याची सूचना पूल विभागाला केली आहे..

मुलांनी बॅट आपटल्याने लाद्या उखडल्या

पुलावरील लाद्या उखडल्याने कंत्राटदाराकडून नवीन लाद्या बसवून घेण्यात आल्या आहेत. लाद्या उखडल्या अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर दक्षता विभागाने तपासणी केली असून कंत्राटदारांवर कारवाई करण्याची सूचना केली आहे. या पुलावरून खेळण्यासाठी ये-जा करणारी मुले पुलावर बॅट आदळत असल्याने लाद्या उखडल्या आहेत. सद्य:स्थितीत पुलाचे काम पूर्ण झाले असून ये-जा करण्यासाठी खुला आहे, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्याने दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in