पाचव्या दिवशीही बाजार सकारात्मक;निफ्टी सलग आठव्या दिवशी तेजीत

दोलायमान स्थितीनंतर दि३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३७.८७ अंक किंवा ०.०६ टक्का वधारुन ६०,२९८वर बंद झाला
पाचव्या दिवशीही बाजार सकारात्मक;निफ्टी सलग आठव्या दिवशी तेजीत

जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरण असतानाही निवडक ब्ल्यू-चीप कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्याने सलग पाचव्या दिवशी, गुरुवारी सेन्सेक्स वधारुन बंद झाला. रुपयाची घसरण आणि आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे देशांतर्गत बाजार वाढण्यास मदत झाली, असे एका दलालाने सांगितले.

दोलायमान स्थितीनंतर दि३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ३७.८७ अंक किंवा ०.०६ टक्का वधारुन ६०,२९८वर बंद झाला. दिवसभरात तो ६०,३४१.४१ ही कमाल आणि ५९,९४६.४४ ही किमान पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी सलग आठव्या दिवशी तेजीत राहिला. निफ्टीमध्ये १२.२५ अंकांची वाढ होऊन १७,९५६.५०वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत कोटक महिंद्रा बँकेचा समभाग सर्वाधिक ३.४५ टक्के वधारला. त्यानंतर लार्सन ॲण्ड टुब्रो, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रीड, इंडस‌्इंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयटीसीच्या समभागात वाढ झाली. तर डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, विप्रो, इन्फोसिस, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, ॲक्सीस बँक आणि नेस्ले यांच्या समभागात घसरण झाली.

गुरुवारी सकाळी नकारात्मक सुरुवात झाल्याने बाजारात दुपारपर्यंत दोलायमान स्थिती राहिली. दिवसअखेरीस बाजारात वाढ झाली. मात्र, ऊर्जा, आरोग्यविषयक, आयटी, वाहन, धातू, तंत्रज्ञान, तेल आणि वायू कंपन्यांच्या समभागात घसरण झाली.

आशियाई बाजारात सेऊल, टोकियो, शांघायमध्ये घट झाली तर युरोपमध्ये दुपारपर्यंत संमिश्र वातावरण होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.४१ टक्के वधारुन प्रति बॅरलचा भाव ९४.९७ अमेरिकन डॉलर्स झाला. तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी भातरीय भांडवली बाजारातून बुधवारी २,३४७.२२ कोटींच्या समभागांच्या शेअर्सची खरेदी केली.

logo
marathi.freepressjournal.in