सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध दहिसर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे
आत्महत्या
आत्महत्याप्रातिनिधिक प्रतिमा

मुंबई : सततच्या मानसिक व शारीरिक शोषणाला कंटाळून विमल शंकर कासले या २५ वर्षांच्या महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दहिसर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध दहिसर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. शंकर नागेश कासले, राधा नागेश कासले, नागेश कासले, तुकाराम नागेश कासले आणि गंगा अशी या पाचजणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. विमलचा शंकरसोबत विवाह झाला होता. ते सर्वजण दहिसरच्या कोकणीपाड्यात राहत होते. शंकरला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे त्यांची पहिली पत्नी त्यांना सोडून निघून गेली होती. त्यानंतर त्याने विमलशी दुसरे लग्न केले होते. या दोघांनाही दहा आणि सात वर्षांचे दोन मुले आहेत. लग्नानंतर एक वर्ष त्यांचा संसार सुरळीत सुरू होता; मात्र नंतर शंकर हा दारूच्या नशेत विमलचा शिवीगाळ करून सतत मारहाण करत होता.

logo
marathi.freepressjournal.in