देशभरासह राज्यातही कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. अशामध्ये आता प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून मुंबई महानगर पालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई आयुक्त महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी मास्कसक्तीचा निर्णय घेतला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीनंतर त्यांनी बीएमसीच्या कार्यालयांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये मास्कसक्तीचे आदेश दिले आहेत.
आज बीएमसीचे आयुक्त इक्बाल चहल यांनी एक बैठक बोलावली होती. यामध्ये बीएमसीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, बीएमसी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह पालिकेतील रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून म्हणजे मंगळवारपासून करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढू लागला आहे.