Mumbai best bus fire: जे.जे. हॉस्पिटलजवळ बेस्ट बसला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

आग लागल्यापूर्वी ही बस रिकामी करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली
Mumbai best bus fire: जे.जे. हॉस्पिटलजवळ बेस्ट बसला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईतील बेस्ट बसला शनिवारी(९ डिसेंबर) सकाली आग लागल्याची घटना घडली. बसला आग लागल्याचे आणि अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. या पेटलेल्या बसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र बस पुर्णताच जळून खाक होताना व्हिडिओत दिसत आहे. आग लागल्यापूर्वी ही बस रिकामी करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

आज शनिवार ९ डिसेंबर रोजी नागापाडा सिग्नलवर जेजे हॉस्पिटलजवळ बेस्टच्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर परिसार एकच धावपळ उडाली. आग लागल्या अगोदर बसमधील प्रवासी खाली करण्यात आली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवान आग विझवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न करताना या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशळ मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फ्री प्रेस जर्नलने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in