भायखळ्यामधील मदनपुरा सैफी इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल

या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये पाच जण अडकले असून त्याची आता सुटका करण्यात आली आहे
भायखळ्यामधील मदनपुरा सैफी इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून आग लागण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे .अशातच आता आज सकाळी मुंबईतील भायखळ्यामधील मदनपुरा येथे सैफी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग इतकी भीषण होती की चक्क अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये पाच जण अडकले असून त्याची आता सुटका करण्यात आली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती आद्यपि मिळालेली नाही . तसेच ही आग नक्की कशामुळे लागली आहे ते देखील अद्याप अस्पष्ट आहे.

logo
marathi.freepressjournal.in