गिरणगावात सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी; गर्दीने गणेशभक्त हैराण

गणेशगल्लीचा राजा, महागणपती अशा प्रसिद्ध गणरायाच्या दर्शनासाठी मुंबईसह, देशभरातून गणेशभक्त दर्शनासाठी येतात
गिरणगावात सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी; गर्दीने गणेशभक्त हैराण

दोन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात आपल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याने लालबाग, चिंचपोकळी, काळाचौकी, भारतमाता, डिलाईडरोड आणि भायखळा विभागात प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यातच वाहने रस्त्यात कुठेही पार्क केल्यामुळे या वाहतूककोंडीत वाढ झालेली आहे.

गणेशोत्सवात गिरणगावातील लालबागचा राजा, चिंतामणी, तेजुकायाचा राजा, गणेशगल्लीचा राजा, महागणपती अशा प्रसिद्ध गणरायाच्या दर्शनासाठी मुंबईसह, देशभरातून गणेशभक्त दर्शनासाठी येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गणेशभक्तांची गर्दी या विभागात होते. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी या ठिकाणच्या गर्दीत प्रचंड वाढ होते. त्यामुळे रस्त्यांवर वाहने चालविणे देखील अवघड होते. त्यातच हे गणेशभक्त रस्त्यात कुठेही उभे राहत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. गणेशभक्त मुंबई बाहेरून आलेले असल्याने माहिती नसल्याने मिळेल, त्या जागी वाहने उभी करतात त्यातच विभागातील रस्ते छोटे असल्याने वाहतूककोंडीच्या समस्येत वाढ होताना दिसते.

शनिवारी लालबागचा राजा, चिंतामणी, तेजुकायाचा राजा, गणेशगल्लीचा राजा, महागणपतीला पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांची गर्दी उसळली. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीचे मार्ग न समजल्याने काळाचौकी विभागात गर्दी निर्माण झाली. त्यातच वाहनातून येणारे भाविकदेखील थांबत असल्याने वाहतूक पोलीस रात्री दोन ते अडीज वाजेपर्यंत वाहतूककोंडी सोडविण्याच्या कामात लागले होते.

शुक्रवारपर्यंत बंद केलेले मार्ग

डॉ . बी. ए रोड -भारतामाता जंक्शन ते बावला कॉम्पाउंड (डिके रोड जंक्शन )

डॉ . एस . एस .राव रोड / गोपाळ नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकीपर्यत

दत्ताराम लाड मार्ग श्रावण यशवंते चौक ते सरदार हॉटपर्यंत

साने गुरुजी मार्ग संत जगनाडे चौक / गस कंपनी नाक्यापासून ते आर्थर रोड नाक्यापर्यंत

गणेशनगर लेन चिवडा गल्ली / पूजा हॉटेल ते बीए रोडपर्यंत

दिनश पेटीट लेन /चव्हाण मसाला ते बीए रोड पर्यंत

टीबी कदम मार्ग /व्होल्टास कंपनी ते उडीपी हॉटेलपर्यंत

परीस्टर नाथ पै मार्ग/ उत्तर वाहिनी ते श्रावण यशवंते चौक

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in