
वीकेंड, १५ ऑगस्ट आणि पारसी न्यू इयरच्या सलग आलेल्या सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी महानगराच्या बाहेर जाण्याचं ठरवल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-पुणे एक्प्रेसवेवर शनिवार दिवसभर, रात्री आणि आता रविवारी सकाळपर्यंत ही वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मिळालेल्या सलग सुट्यांमुळे लोणावळा, महाबळेश्वर, कोल्हापूर अशा पर्यटनस्थळापवर जाण्यासाठी निघालेल्या पर्यंटकांची या वाहतूककोंडीमुळे मोठ्या प्रमाणावर निराशा झाली. यावेळी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर बोरघाटात वाहनांच्या रांगाचं रांगा लागल्या होत्या. तर बोरेघातील अमृतांजन कमानपासून खोपोलीकडे वाहनांच्या रांगा २४ तासांहून जास्त वेळ लागल्या होत्या.
सुट्यांमध्ये निसर्गाचा आनंद घ्यायला जाणाऱ्या पर्यंटकांना मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर मोठ्या मोठ्या मनस्ताप झेलावा लागत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सलग दुसऱ्यादिवशी म्हणजे रविवारी देखील वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. यावेळी या महामार्गावर दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत., प्रशासनाने सरकारी वाहनांचा वापर करण्याची विनंती करुन देखील पर्यटक खासगी वाहनांना प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे सुट्टी किंवा सणासुदीच्या दिवशी ही वाहतूक कोंडी होताना दिसत आहे.
दरम्यान, आज मुबंईत देखील लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक असल्याने आधीच ट्रेनने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यात ही मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक अजून जास्त त्रस्त झाले आहे.