‘धारावी’चा मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात; सॅम्पल फ्लॅट लवकरच बांधण्यात येणार

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड स्थापन करण्यात आली आहे.
‘धारावी’चा मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात; सॅम्पल फ्लॅट लवकरच बांधण्यात येणार
BL Soni

मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड स्थापन करण्यात आली आहे. धारावीचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी कंपनीने शहर नियोजन आणि पायाभूत अभियांत्रिकीसाठी विख्यात असलेल्या विदेशी कंपन्यांची मदत घेतली आहे. हा प्लॅन अंतिम टप्प्यात असून, तो पूर्ण होताच धारावीत एक सॅम्पल फ्लॅट उभारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी धारावीत बायोमेट्रिक सर्व्हे सुरू आहे. असे असतानाच धारावीचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हा प्लॅन भारतातील आणि जगभरातील उच्च-प्रोफाइल नियोजक आणि डिझाइनर करत आहेत. लवकरच 'धारावी'चा मास्टर प्लॅन प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे डीआरपी'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

धारावी मास्टर प्लॅनमध्ये निवासस्थानांची उभारणी, आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. मास्टर प्लॅन तयार झाल्यानंतर तो रहिवाशांच्या माहितीसाठी धारावीत जगोजागी लावण्यात येणार आहे. तसेच धारावीचा विकास कशाप्रकारे होणार आहे, त्याचे संपुर्ण गृहप्रदर्शन धारावीतच भरविण्याचा विचार आहे. तसेच लवकरच सॅम्पल फ्लॅट सुद्दा बांधण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने दिली.

logo
marathi.freepressjournal.in