आजपासून माथेरान बेमुदत बंद! पर्यटकांची फसवणूक थांबवा, जागोजागी माहिती फलक, CCTV बसवा: पर्यटन बचाव संघर्ष समिती

माथेरान बेमुदत बंद करण्याचा इशारा देऊन दहा दिवस उलटूनही स्थानिक प्रशासनाने यावर उपाययोजना केली नाही. त्यामुळे माथेरान बेमुदत बंद करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

माथेरान : दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले असोत किंवा कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये, जागोजागी माहिती फलक लावण्यात यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, या मागण्या माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केल्या होत्या. या मागण्यांसाठी माथेरान बेमुदत बंद करण्याचा इशारा दिला होता. दहा दिवस उलटूनही स्थानिक प्रशासनाने यावर उपाययोजना केली नाही. त्यामुळे माथेरान बेमुदत बंद करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.

अधीक्षक कार्यालयात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली
अधीक्षक कार्यालयात माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली

दस्तुरी नाक्यावर येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली जाते. याचा येथील सर्वसामान्य कष्टकऱ्यांपासून हॉटेल इंडस्ट्री या सर्वांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होतो. ही फसवणुकीची पद्धत लवकरच बंद करण्यात आली नाही तर १८ मार्चपासून बेमुदत माथेरान बंद करण्यात येणार असल्याचा इशारा समितीने दिला होता. त्यासाठी अधीक्षक कार्यालयात समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नसून माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने मागणी केलेल्या शुल्लक मागण्यांची पूर्तता प्रशासन करू शकत नसल्याने पर्यटन बचाव संघर्ष समितीने १८ मार्चपासून बेमुदत बंद जाहीर केला आहे.

या बंदला येथील हॉटेल इंडस्ट्री, ई रिक्षा संघटना, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्था यांनी समर्थन दिले आहे. जोपर्यंत स्थानिक प्रशासन या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे पर्यटनस्थळ बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या बंदमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा ई रिक्षाची सेवा बंद करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी सांगितले.

स्थानिक प्रशासन लेखी स्वरूपात मागणी केलेल्या मागण्या कायमस्वरूपी पूर्ण करत नाही, तोपर्यंत हे पर्यटनस्थळ बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

logo
marathi.freepressjournal.in