‘मावळा’ने केला दुसरा टप्पा पार, कोस्टल रोड प्रकल्पाला गती

कोस्टल रोडचे ५६ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ४४ टक्के काम वेळे आधी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘मावळा’ने केला दुसरा टप्पा पार, कोस्टल रोड प्रकल्पाला गती

मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला आता चांगलाच वेग आला आहे. ठरलेल्या वेळेपूर्वीच पहिला बोगदा खोदण्यात यश आलेल्या ‘मावळा’ने ( टीबीएम मशीन) दुसऱ्या बोगद्याचा ५९४ मीटरचा टप्पा फत्ते केला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण होईल आणि डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत असेल, असा विश्वास मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कोस्टल रोडचे ५६ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ४४ टक्के काम वेळे आधी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मोकळा श्वास व सुखकर प्रवास असा महत्त्वपूर्ण प्रकल्प कोस्टल रोडच्या कामाला वेग आला आहे. जमीनीखाली १० ते ७० मीटर खोल दोन बोगदे खोदले जात असून चार मजली इमारतीची उंची असणाऱ्या मावळ्याने २.०७२ किलोमीटरचा पहिला बोगदा खोदण्याचा टप्पा ११ जानेवारी २०२२ रोजी पार केला आहे. तर दुसऱ्या बोगद्याच्या कामासाठी ३० मार्च रोजी मावळ्याने कूच केली आहे. छोटा चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क २.०७२ किलोमीटरपर्यत बोगदा खोदण्यात येत असून तीन महिन्यांच्या कालावधीत ५९४ मीटरचे अंतर पार केल्याने पुढील सहा महिन्यांत दुसरा बोगद्याचे काम पूर्ण होईल, असे ही अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in