कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगदा खोदण्याचा १८३ मीटरचा टप्पा ‘मावळा’ने केला यशस्वी पार

कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगदा खोदण्याचा १८३ मीटरचा टप्पा ‘मावळा’ने केला यशस्वी पार

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगदा खोदण्याचा १८३ मीटरचा टप्पा ‘मावळा’ने यशस्वी पार केला आहे. २०१८मध्ये सुरू झालेल्या कोस्टल रोडचे ५३ टक्के काम पूर्ण झाले असून जानेवारी २०२३ पर्यंत दुसरा बोगदा खोदण्याचे काम पूर्ण होईल. त्यामुळे नियोजित डिसेंबर २०२३ पर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत असेल, असा विश्वास मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दैनिक ‘नवशक्ति’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

मोकळा श्वास व सुखकर प्रवास असा महत्त्वपूर्ण प्रकल्प कोस्टल रोडच्या कामाला वेग आला आहे. जमिनीखाली १० ते ७० मीटर खोल दोन बोगदे खोदले जात असून चार मजली इमारतीची उंची असणाऱ्या मावळ्याने २.०७२ किलोमीटरचा पहिला बोगदा खोदण्याचा टप्पा ११ जानेवारी २०२२ रोजी पार केला. तर दुसऱ्या बोगद्याच्या कामासाठी मावळ्याने कूच केली असून, छोटा चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क २.०७२ किलोमीटर दुसऱ्या बोगदा खोदण्यास ३१ मार्चपासून सुरुवात झाली असून १८३ पर्यंत बोगदा खोदण्याचे काम पूर्ण झाले आहे.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असून मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कोस्टल रोडच्या कामाचा शुभारंभ पार पडला. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू आहे. २०१८ मध्ये सुरू झालेल्या कामाला वेग आला असताना २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि काही काळासाठी कोस्टल रोडचे काम मंदावले होते.

बोगद्याची वैशिष्ट्ये

* प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत २.०७२ किमीचा बोगदा. असाच बोगदा आता मार्च-एप्रिलपासून गिरगाव ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत खोदण्यात येईल. दोन्ही बोगद्यांमध्ये प्रत्येकी तीन लेन असतील.

* बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी वायुवीजनाची ‘सकार्डो’ यंत्रणा वापरली जाणार आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पालिका नियंत्रण कक्ष, अग्निशमन दलाला तत्काळ मेसेज जाऊन मदत घेता येईल.

* बोगदा खोदणारा मावळा टनेल बोअरिंग मशीनचे वजन तब्बल २३०० टन आहे. तर व्यास १२.१९ मीटर आहे. तर मावळा मशीनची उंची चार मजली इमारती एवढी आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे.

एकल स्तंभाचे काम प्रगतिपथावर

भारतातील पहिले तंत्रज्ञान कोस्टल रोडच्या प्रकल्पात वापरण्यात आले आहे. कोस्टल रोड हा एकल स्तंभावर उभारण्यात येत असून पॅकेज १ आणि २ मधील मोनोपाईलचे कामदेखील प्रगतिपथावर असल्याचे अश्विनी भिडे यांनी सांगितले.

४,५०० कामगारांचे रात्रंदिवस काम

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण असून २०१८ मध्ये कोस्टल रोडच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. ४,५०० कामगारांच्या माध्यमातून कोस्टल रोडचे काम सुरू असून, बोगद्याच्या कामासाठी तब्बल २५० कामगार कार्यरत आहेत.

Related Stories

No stories found.