टी-२० नॉकआउट स्पर्धेत माझगाव क्रिकेट क्‍लब विजयी

टी-२० नॉकआउट स्पर्धेत माझगाव क्रिकेट क्‍लब विजयी

अष्टपैलू ओमकेश कामतच्या (दोन विकेट आणि ५२ धावा) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर माझगाव क्रिकेट क्‍लबने जॉन ब्राइट क्रिकेट क्‍लब आयोजित एमसीए राठोड ट्रॉफी २५ वर्षांखालील टी-२० नॉकआउट स्पर्धेत पार्कोफेने क्रिकेटर्स संघावर तीन विकेट राखून मात केली.

इस्लाम जिमखाना येथे झालेल्या स्पर्धेत ओमसह निपुण पांचाळ आणि सिमत दुबेच्या (प्रत्येकी २ विकेट) अचूक आणि प्रभावी माऱ्यासमोर माझगाव सीसीने पार्कोफेने संघाला २० षट्कांत ९ बाद १५८ धावांवर रोखले. त्यानंतर प्रतिस्पर्ध्यांचे १५९ धावांचे आव्हान १८.१ षट्कांत सात विकेट्सच्या बदल्यात पार केले. ओमकेश कामतने फलंदाजीतही मोलाचे योगदान देत २२ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षट्कारांसह ५२ धावांची खेळी केली. त्याला हर्ष मोगावीराची (२७ धावा) चांगली साथ लाभली.

अन्य लढतींमध्ये दादर पारसी झोरोस्ट्रियनने व्हिक्टरी सीसीवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. पय्याडे एससीने जॉन ब्राइट सीसीचा ७६ धावांनी पराभव केला. एमआयजी क्रिकेट क्‍लबला शिंद एससीकडून आठ विकेट्सनी मात खावी लागली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in