मेट्रो प्रशासनातर्फे ‘माझी मेट्रो फेस्टिव्हल २०२२’ला सुरुवात

महोत्सवाच्या माध्यमातून मेट्रो गाडी, मेट्रो स्थानक आणि मेट्रोचा परिसरात चित्र रेखाटण्याची, सजविण्याची संधी
मेट्रो प्रशासनातर्फे ‘माझी मेट्रो फेस्टिव्हल २०२२’ला सुरुवात

मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडतर्फे (एमएमओपीएल) दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘माझी मेट्रो फेस्टिव्हल २०२२’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ‘ट्रेन डेकल डिझाइन’ या संकल्पनेवर आधारित ‘माझी मेट्रो फेस्टिव्हल’ पार पडणार असून स्पर्धक, कलाकारांना मेट्रो गाडी सजविण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना १८ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. तसेच यासंबंधीची सर्व माहिती ‘एमएमओपीए’च्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १’ मार्ग जून २०१४ मध्ये वाहतूक सवेत दाखल झाला. ‘मेट्रो १’ सुरू झाल्यापासून ‘एमएमओपीएल’कडून ‘माझी मेट्रो फेस्टिव्हल’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा या महोत्सवाचे आठवे वर्षे असून या महोत्सवाच्या माध्यमातून कलाकार आणि सामान्य नागरिकांना मेट्रो गाडी, मेट्रो स्थानक आणि मेट्रोचा परिसरात चित्र रेखाटण्याची, सजविण्याची संधी उपलब्ध करण्यात येते. या महोत्सवासाठी एखादी संकल्पना निश्चित करण्यात येते. महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांकडून संकल्पनेच्या आधारावर चित्रांचा आराखडा मागविण्यात येतो. त्यातून काही विजेत्यांची निवड करण्यात येते आणि त्यांच्या चित्रांनी स्थानक वा मेट्रो गाड्या सजविण्यात येतात. अशा या अनोख्या महोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली आहे. महोत्सवासात सहभागी होण्यासाठी १८ ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू झाली असून १८ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या महोत्सवातील विजेत्यांची नावे २२ डिसेंबर रोजी घोषित करण्यात येणार असून २७ डिसेंबरला विजेत्यांच्या चित्रांनी मेट्रो गाड्या सजविण्यात येणार असल्याची माहिती एमएमओपीएलकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in