

बिग बॉस १६चा विजेता ठरलेला रॅपर एमसी स्टॅन चांगलाच चर्चेत आला आहे. बिग बॉसमुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येमध्ये आणखी वाढ झाली आहे. नुकतेच मुंबईमध्ये त्याचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारो तरुणांनी या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या कॉन्सर्टचे एक तिकीटाची किंमत ५ हजारांपर्यंत होती. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर आता तो देशभर आपले कॉन्सर्ट करणार आहे.
बिग बॉसच्या १६ व्या पर्वाचे विजेतेपद रॅपर एमसी स्टॅनने पटकावले. यानंतर त्याच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये त्यांचे कॉन्सर्ट असणार आहेत. मुंबईमधूनच त्याच्या या भारत टूरला सुरुवात असून त्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याला लाईव्ह पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी मुंबईमध्ये हजारो तरुणांनी गर्दी केली होती. या कॉन्सर्टचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे या कॉन्सर्टला बिग बॉसचा उपविजेता शिव ठाकरे, सुंबूल तौकीर खान व निमृत कौर अहलुवालिया यांनीही हजेरी लावली होती. या कॉन्सर्टच्या तिकिटांची किंमत ही ८०० रुपयांपासून ५ हजारांपर्यंत होती.