Video | Swiggy वरून मागवलेल्या जेवणात सापडली औषधाची गोळी; मुंबईतील लिओपोल्ड कॅफेमधील धक्कादायक प्रकार

उज्वलने केलेल्या ट्विटला 2.9 अधिक व्ह्यूज मिळाले असून 2,000 पेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे. तसेच यावर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Video | Swiggy वरून मागवलेल्या जेवणात सापडली औषधाची गोळी; मुंबईतील लिओपोल्ड कॅफेमधील धक्कादायक प्रकार
Published on

मुंबईतील एका व्यक्तीला Swiggy वरुन ऑर्डर केलेल्या जेवणात गोळी(Medicine) आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उज्वल पुरी नावाच्या व्यक्तीने मुंबईतीच्या कुलाबा येथील प्रतिष्ठित लिओपोल्ड कॅफेमधून(Leopold Cafe) ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला(रविवारी) ऑनलाईन जेवण ऑर्डर केले होते. या ऑयस्ट सॉसमधील चिकनमध्ये उज्वल यांना औषधाची गोळी सापडली आहे. त्यांनी एक्सवर याबाबतचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत.

उज्वलने एक्सवर हे फोटो शेअर करताना, “माझे मुंबई ख्रिसमस सरप्राईज, कुलाब्यातील लिओपोल्ड येथून स्विगीवरुन जेवण ऑर्डर केले. या जेवणात अर्धवट शिजलेली औषधाची गोळी सापडली”, असे कॅप्शन दिले आहे. उज्वलच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर स्विगीने त्याला उत्तर देत याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

“घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही आमच्या रेस्टॉरंट भागीदारांकडून चांगल्या अपेक्षा करतो, उज्वल आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही याकडे लक्ष देतो," असे स्विगीने म्हटले आहे.

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना उज्वलने स्विगीने घडलेल्या प्रकारावर माफी मागितली असून ऑर्डर केलेल्या जेवणाचे पैसे परत केल्याचे सांगितले. तो पुढे म्हणाला, “मी स्विगी आणि झोमॅटोवरुन नियमितपणे जेवण ऑर्डर करतो. मला असा अनुभव कधीही आला नाही. घडलेल्या प्रकाराने मला किळस वाटली आणि मी जेवण फेकून दिले.”

उज्वलने केलेल्या ट्विटला 2.9 अधिक व्ह्यूज मिळाले असून  2,000 पेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे. तसेच यावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने तर, “आशा करतो त्यांनी तुझ्याकडून औषधाचे जास्तीचे पैसे घेतले नसतील.” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने, “स्वयंपाक्याला डोकेदुखी असेल”, असे म्हटले आहे. एकाने तर, “लिओपोल्ड 26/11 मधून अजूनही बराच होत आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने तर या कॅफेचे वाभाडेच काढले आहेत. त्याने, “या कॅफेमध्ये गेलो आहे. या ठिकाणची स्वच्छता बघितली आहे. त्यामुळे अजिबात आश्चर्य वाटले नाही.”, असे म्हटले आहे.  

logo
marathi.freepressjournal.in