मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर रविवार, २६ मे रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर रविवार, २६ मे रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे रविवारी कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

मध्य रेल्वे मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी सकाळी १०.१४ ते दुपारी ३.०९ वाजेपर्यंत सीएसएमटी मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन स्लो मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या पुढे डाउन स्लो मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे स्थानकावर येतील. ब्लॉक कलावधीत या गाड्या नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.तर सकाळी १०.२५ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या यूपी फास्ट मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान यूपी फास्ट मार्गावर वळवण्यात येईल. या गाड्या नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार रेल्वे स्थानकावर थांबणार नाहीत. या गाड्या पुढे माटुंगा स्थानकावर अप स्लो मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहचतील.

हार्बर मार्गावरील सेवा बंद

> सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत सीएसएमटी /वडाळा रोड वरून सुटणारी वाशी/बेलापूर/पनवेल डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटीहून सुटणारी वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

> पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटीसाठी गोरेगाव/वांद्रेहून सुटणारी अप हार्बर लाईनवरील सेवा सकाळी १०.४५ ते ५.१३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

> ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत

पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली आणि गोरेगाव स्थानकादरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकल गोरेगाव आणि बोरिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. यामुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणत्याही सुटणार नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in