Mumbai : प्रवाशांनो लक्ष द्या...रविवारी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक

रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर आणि विविध अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)एएनआय
Published on

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर आणि विविध अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर, तर पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील व पुढे मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानावर पोहोचतील.

चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्टेशन दरम्यान जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वेने रविवार ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्टेशन दरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत सर्व अप आणि डाऊन स्लो मार्गावरील गाड्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्टेशन दरम्यान जलद मार्गांवर चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही चर्चगेट गाड्या वांद्रे/दादर स्टेशनवरून शॉर्ट टर्मिनेट/रिव्हर्स केल्या जातील.

logo
marathi.freepressjournal.in