मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावर 'नो ब्लॉक'

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.
मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वे मार्गावर 'नो ब्लॉक'
Published on

मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, ७ जानेवारी रोजी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत काही लोकल उशिराने धावत असून, काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्ग सकाळी ११.३० ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत, तर ठाण्याच्या पुढे जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील, तर ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात आल्या आहेत.

हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. (बेलापूर-खारकोपर आणि नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित नाही), (नेरुळ/बेलापूर-खारकोपर बंदर मार्ग वगळून) या कालावधीत पनवेल स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा बंद असणार आहे. तर पनवेल स्थानकातून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल अप ट्रान्सहार्बर लोकल आणि पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद असणार आहे.

विशेष लोकल सेवा

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. तर ठाणे-वाशी/नेरूळ दरम्यान ट्रान्सहार्बर लाईन लोकल सेवा उपलब्ध असेल. तर बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.

logo
marathi.freepressjournal.in