मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक
मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, २७ ऑगस्ट रोजी मध्य व हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. दुरुस्तीच्या कामामुळे दोन्ही मार्गावरील काही लोकल उशीराने धावण्याची शक्यता असून, काही लोकल रद्द करण्यात येतील, मुंबई उपनगरीय रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड - वैतरणा स्थानकादरम्यान अप व डाऊन मार्गावर शुक्रवार ते शनिवार रात्री दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे - कल्याण अप डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते सायंकाळी ३.४० दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या डाउन जलद, अर्ध जलद लोकल ठाणे व कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या येतील. कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. तर कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या अप जलद, अर्धजलद लोकल कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर मुलुंड स्थानकापुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबतील. तसेच सीएसएमटी, दादर स्थानकातून सुटणाऱ्या डाउन मेल, एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. तर सीएसएमटी व दादरला येणाऱ्या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे, विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावरील पनवेल - वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर तुर्भे आणि नेरुळ दरम्यानच्या ट्रान्स हार्बर मार्गांसह सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी - पनवेल व पनवेल - सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. नेरुळ स्थानकातून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल आणि ठाणे स्थानकातून नेरुळसाठी जाणारी डाउन ट्रान्सहार्बर लाईन लोकल सेवा बंद असेल. तर नेरूळहून सुटणारी खारकोपरची डाउन लाइनवरील लोकल आणि खारकोपरहून नेरूळसाठी सुटणारी अप मार्गावरील लोकल रद्द असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in