Megablock: मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आल्याने रविवारी दिवसकालीन ब्लॉक रद्द
Megablock: मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
ANI

मुंबई : रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार २६ नोव्हेंबर रोजी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आल्याने रविवारी दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेच्या माटुंगा - ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कालावधीत सीएसएमटी सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. तर पुढे ठाणे स्थानकावर योग्य धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. तर

कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्याने ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकात थांबतील. तर पुढे माटुंगा येथे योग्य अप धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. (नेरुळ/बेलापूर-खारकोपर बंदर मार्ग वगळून) या कालावधीत पनवेल स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी स्थानकातून पनवेल, बेलापूरला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल बंद राहतील. तर पनवेल स्थानकातून ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल स्थानकातून ठाण्याकडे जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद असणार आहे.

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

रुळांची दुरुस्ती ओव्हरहेड वायर दुरुस्ती सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी शनिवारी रात्री १२.३० ते रविवार पहाटे ४.३० वाजेपर्यंत बोरिवली - भाईंदर स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक कालावधीत सर्व जलद मार्गावरील गाड्या विरार, वसई रोड ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in